ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी अखंड सिंगल होतो. आधल्या रात्री मला बरं नव्हतं म्हणून मी मेडिकल स्टोर मध्ये जायला निघणारच तितक्यात माझ्या रूममेटचा (निखिल) चा आवाज आला –
“भावा, जातच आहेस तर एक पॅकेट घेऊन येशील?”
“कोणता? ओरिओ, पाले-जी की आणखी दुसरा?”
“आबे येड्या-लोड्या, कंडोम आणशील, एक पॅक”
त्याची गर्लफ्रेंड (रोहिणी) आज फ्लॅट वर आलीय या गोष्टीचा मला अंदाज आलाच आणि सोबतच कामक्रीडेचाही कार्यक्रम होऊ शकतो किंवा होईल याचीही चाहूल लागली.
त्या आधी मी कधीच स्वतःसाठी घेतले नव्हते आणि दुसऱ्यासाठीही आणले नव्हते पण; आता जर मी त्याला म्हटलं कि मी या क्षेत्रात नूब आहे तर आणखी फजिती होईलच म्हणून मी हो मध्ये हो मिळवला.
“तू दुकानवाल्याला म्हण, पॅकेट पाहिजे. तो देते बरोबर”
कामराज मेडिकल स्टोर मध्ये पोहचल्यावर मी आधी तर स्वतःसाठी डोलो ६५० घेतली. उपस्थित असलेले बाकी जण सुद्धा त्यांना जे पाहिजे होतं ते घेत होते आणि म्हणूनच कामराज माझ्याकडे दुर्लक्ष करत होता.
“दादा, एक कंडोम द्या” मी म्हणालो.
बाजूच्या काकांचे डोळे मोठे झाले, जवळच्या ताई तर चार पावलं दूरच सरकल्या आणि आता मेडिकल वाल्याला त्याचं हसू आवरत नव्हतं.
गांजा आणि ड्रग्स घेत नव्हतो तर गुन्हा केल्यासारखे सगळे माझ्याकडे बघत होते आणि मेडिकल वाल्यालाही कदाचित लक्षात आलं होतं कि मी पहिल्यांदाच घेतोय कारण मी कोड वर्ड “पॅकेट” वापरला नव्हता. मलाही स्वतःच्या मनात काही लाज नव्हती कारण मी स्वतःसाठी थोडी ना घेत होतो. मी तर माझ्या रूममेटसाठी घेत होतो. म्हणून मला वाटत होतं, त्याला जज करा. मला नाही. पण तिथे उपस्थितांसाठी प्रॉडक्टचा एन्ड यूजर मीच आहे हेही गोष्ट लक्षात ठेवायचचीच होती.
“भाऊ कोणता देऊ? पॅक ऑफ ३ कि पॅक ऑफ ६?” – कामराज म्हणाला
आता जर मी पॅक ऑफ ३ म्हटलं तर हा माझा स्टॅमिना कमी आहे असं समजू शकते म्हणून मी म्हणालो “सर्वात मोठा पॅक कितीचा आहे? तोच दे”
“कोणता फ्लेवर पाहिजे?” कामराजने विचारलं.
“उम्म्म…… मला तर चॉकलेट आवडतो” मी उत्तरलो.
“पण तुला खायचा नाहीये ना”. कामराज फुल्ल-ऑन बकलोली करण्याच्या मूड मध्ये आलेला होता.
“बरं ना…. दे तू, तरीही चॉकलेट दे”
“कोणत्या टाईपचा पाहिजे? Ribbed, Dotted, Thin, Ultra Thin?”
“कोणता साईज देऊ? लार्ज, मिडीयम, स्मॉल कि एक्सट्रॅआआ स्मॉल?”
मान्य मी पहिल्यांदा विकत घेत होतो पण मी इतका बिपिया तर न्हाईये कि मला आता पर्यंत कळालं नाही कि तो माझा गेम घेतोय.
पण स्वतःला डिफेन्ड करू शकत नव्हतो. लाचारी आली होती माझ्यावर.
“भाऊ दे, मिडीयम साईज दे” मी वैतागून त्याला उत्तरलो.
“आणि तूच सांग ना, कोणता वापरला कि जास्त आनंद मिळतो? तुला तर अनुभव असेलच. तुझं तर नावही कामराज आहे. लहान तर करूच शकतो ना” – आता माझ्यातला बकलोल बाहेर डोकावायला लागला होता.
मला वाटलं आता तो माझा प्रोडक्ट मला तर तोही नागपूरचा होय. मुजोरी अंगातच आहे.
“मग, कोणत्या ब्रँड चा देऊ?”
यावेळी मला त्याचा आणि निखिलचा दोघांचाही तीव्र राग लागला होता कारण हे कंडोम विकत घेण्याच्या प्रक्रियेत कळत नकळत मी बकरा बनलो होतोच.
“कोणती ब्रँड? कोणतावाला लवकर फाटत नाही?”
“ड्युरेक्स, कामसूत्रा, मॅनफोर्सचे छान असतात. कोहिनूरची क्वालिटी जरा रद्दी येते.”
“हां, मग कोहिनूर दे.”
त्याचा हसरा चेहरा आश्चर्यकाचीत झाला.
“कोहिनुरच दे, कारण मला माझ्यासाठी नकोय माझ्या रूममेटसाठी हवाय”
आज माझ्या रूममेट च्या मुलाचा चौथा वाढदिवस आहे. लहान निखिलला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Subscribe to our email newsletter to get the latest posts delivered right to your email. Thanks. Visit Again.
Comments